जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना दि.११ रविवार रोजी धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा पुलाजवळ महामार्ग क्रमांक सहावर जळगावकडून येणारा ट्रक क्रमांक (एम.एच. ४०, वाय १३०८) जळगावहून एरंडोलकडे जाताना एरंडोलकडून येणारा कंटेनरला क्रमांक (एम.एच. ४०, सीटी. ४०३५) धडकला. या अपघातात चालक गंभीर जखमी असल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल कडून येतांना डाव्याबाजूला रस्त्याचे काम सुरु होते त्यामुळे उजव्या बाजूने येणारे व जाणारे दोन्ही कडचे वाहने जात असतांना दोन्ही गाड्या एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला होता. यात दोन्ही ट्रकच्या समोरील बाजूचा चुराडा झाला. यामुळे दोन्ही वाहनांचे चालक अर्धातास कॅबिनमध्ये अडकून पडले होते. कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकांना दोरीच्या साहाय्याने दोन्ही वाहनांना ओढून बाहेर काढण्यात आले. या घटनेत चालक गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मिळताच पाळधी पोलिस घटनास्थळी पोहोचले.