जळगाव मिरर | २१ जून २०२३
जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्रात मोठी वाढ होता असताना दिसत आहे नियमित होत असलेल्या दुचाकी चोरट्यांनी पुन्हा एकदा शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढविल्या आहेत. शहरातील एका हॉटेल नजीक लावलेल्या दुचाकी लंपास केल्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील किसनराव नगर परिसरातील रहिवासी असलेले विद्याधर इंगळे (वय ४०) हे दिनांक 13 जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बस स्थानक परिसरात असलेल्या भजे गल्लीतील एका हॉटेल जवळ दुचाकी लावून बाहेर गेले असता या ठिकाणाहून अनोळखी चोरट्यांनी दुचाकी लंपास केली आहे दुचाकी क्रमांक एम एच १९ ए वाय ९१७० या क्रमांकाची दहा हजार रुपये किमतीची असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात दुचाकी चोरी बाबत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहे.