
जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४
दोन मोटार सायकलची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना दि.१७ रोजी रात्री येथील रेल्वे स्थानक रस्त्यावर घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील रेल्वे स्थानक परिसरातील शिव कॉलनीतून किरण चिंतामण तायडे (वय २९) हा मोटार सायकल क्र. एम एच १९ए वाय १६५३ ने रावेर कडे येत असतांना रावेर कडून हर्षद उर्फ दादू सुरेश कदम येणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम एच १९ डी झेड ६०३२ या दोघ मोटार सायकलींची समोरा समोर जोरदार धडक झाली. या अपघातात किरण तायडे हा गंभीर जखमी झाला तर दोन गण जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या किरण तायडे यास येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथामिक उपचार करून पुढील उपचरार्थ बऱ्हाणपूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर इतर दोघांवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले या बाबत विशाल मुकुंदा तायडे याने रावेर दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.