
जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२५
दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास पाळधी बायपासजवळ घडली. अपघातातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा भागातील रहिवाशी असलेले बापुराव महादु पाटील (वय ५६) हे आपल्या पत्नीसोबत संगिता बाबुराव पाटील (वय ४२) यांच्या सोबत दुचाकीने जळगावकडे येत होते. त्यावेळी समोरून येणारी दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात पाळधी बायपास जवळ मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला आहे. या भीषण अपघातात बापुराव पाटील व त्यांची पत्नी संगिता पाटील हे जखमी झाले तर समोरील दुचाकीवरील मगन पुन्या बारेला (वय २५) आणि उपरसिंग बरडे बारेला (वय २२ दोन्ही रा. मध्यप्रदेश) हे दखील जखमी झाले. दाम्पत्याच्या दुचाकीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वार मगन बारेला याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.