जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२४
शहरातील आसोदा शिवारातील पेट्रोलपंपजवळील रोडवर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रविवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा गावात भुषण अरूण भारंबे (वय ४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता भुषण भारंबे हे त्यांचे वडील अरूण विठ्ठल भारंबे यांच्या सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएक्स ८१९५) ने आसोदा गावाकडून जळगावकडे जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यावरील पेट्रोलपंपासमोर त्यांच्यादुचाकला मागून एका दुचाकीने धडक दिली. या धडकेत अरूण विठ्ठल भारंबे हे जखमी झाले. याप्रकरणी रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता भुषण भारंबे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीस्वार भावेश अनिल वाणी रा. आसोदा ता. जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.