
जळगाव मिरर । ४ जानेवारी २०२३
तालुक्यातील एका गावातून तरुणाच्या घराबाहेरून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील हेडावे या गावातील विजय छबीलाल पाटील यांच्या मालकीची दुचाकी दिनांक २ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून अनोळखी चोरट्यांनी लंपास केली आहे. दुचाकी क्रमांक एम.एच १९ ए.आर ४७४३ या क्रमांकाचे २० हजार रुपये किमतीची हि दूचाकी आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना.मिलिंद बोरसे हे करीत आहे.




















