जळगाव मिरर । १६ नोव्हेबर २०२२
जळगाव शहरातील एका मेडिकल समोरून दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नवी पेठेतील भक्ती मेडिकल येथून समीर कैलास भावसार (वय ४६) यांची दुचाकी एम.एच.१९ सी.टी.३८५७ क्र्माकाची स्कुटी अनोळखी इसमाने चोरून नेल्याची घटना दि १५ रोजी घडली आहे. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिसात धाव घेत दुचाकी चोरीची तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.योगेश पाटील हे करीत आहेत.