जळगाव मिरर | २८ मार्च २०२५
महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शिंदेंचे खा.नरेश म्हस्के यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. खा.म्हस्के म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब प्रमाणे आपल्या भावांना आणि अखेरच्या काळात आपल्या वडिलांना देखील त्रास दिला. त्यामुळे ते आधुनिक काळातील औरंगजेब असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.
शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, “ते नवीन युगाचे ‘आधुनिक औरंगजेब’ आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावांना औरंगजेब सारखेच त्रास दिला. राज ठाकरेंनी स्वतः म्हटले होते की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या शेवटच्या काळात त्रास दिला… ते त्यांच्या वडिलांच्या विचारसरणीचे पालन करत नव्हते. म्हणूनच उद्धव ठाकरे हे ‘आधुनिक औरंगजेब’ आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व विचारसरणीचे शत्रू असलेल्यांशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप देखील नरेश म्हस्के यांनी केला आहे.
नरेश म्हस्के यांनी दावा केला की, “राज ठाकरे हे अनेकवेळा बोलले आहेत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या शेवटच्या काळात खूप त्रास दिला. औरंगजेबाने सत्तेसाठी त्यांच्या भावांना संपवले. उद्धव ठाकरेंनी वेगळे काय केले? त्यांनी पद्धतशीरपणे स्वतःच्या भावांना संपवले. उद्धव ठाकरेंवर आरोप करताना नरेश म्हस्के म्हणाले की, “बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती त्यांनी सोडली, मात्र उर्वरित संपत्तीवर भावाकडे दावा ठोकला.” हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या शेवटच्या काळात त्रास दिला. बाळासाहेब ठाकरेंचे काँग्रेसच्या विचारांशी वैर होते, उद्धव ठाकरेंनी त्या शत्रूंशी हातमिळवणी केली. त्यांच्या मृत्यूनंतरही ते शत्रूंशी हातमिळवणी करून शिवसेनेला दुखावत आहेत, त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना आधुनिक युगाचा औरंगजेब म्हणेन, असे देखील म्हस्के यांनी म्हटले आहे.