जळगाव मिरर | २९ फेब्रुवारी २०२४
शहरातील वाघ नगर परिसरातील सेवानिवृत्त सैनिक चंद्रशेखर सखाराम काळे (वय ४०) हे घरात झोक्यावर बसलेले असताना तोल जाऊन पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाघ नगरील श्री दत्त मंदिराच्या मागील बाजूला चंद्रशेखर काळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. ते सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास काळे हे घरी असताना ते घरात बांधलेल्या झोक्यावर बसलेले होते. अचानक त्यांचा तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नातेवाईकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत काळे यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.