जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका २४ वर्षीय तरुणीला अश्लील अवस्थेतील फोटो तिच्या भावी पतीला पाठवून बदनामीच्या धाकाने १६ हजाराची तरुणाने खंडणी घेतल्याप्रकरणी शहरातील एका तरुणावर जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात २४ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि. मे २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत तरुणाने सदर तरुणीचे अश्लील अवस्थेत फोटो काढले व पीडीतेेचे लग्न ठरल्यानंतर तिच्या भावी पतीला फेसबुकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठवून हे फोटो पाठवत तरुणीच्या चारीत्र्याची बदनामी केली तसेच पीडीतेकडून वेळोवेळी १६ हजारांची खंडणीही घेतली. याप्रकरणी तरुणीने जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी प्रफुल्ल नामक तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा करीत आहे.