जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३ ।
जगभरात सर्वच लोक सोशल मिडियावरील फेसबुकचा वापर करीत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. फेसबुक वापरणाऱ्या युजर्सना आता एका सेवेसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हे पैसे भरावे लागणार का? ते बंधनकारक असणार का की ऐच्छिक असतील याबाबत सगळी माहिती आज समजून घेऊया.
फेसबुकच्या सेवेसाठी युजर्सना पैसे भरावे लागणार आहेत. आता ट्विटरपाठोपाठ फेसबुक देखील पैसे आकारत असल्याने काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. भारतात देखील आता युजर्सना पैसे द्यावे लागणार आहेत का हे जाणून घ्या.
Meta ने रविवारी जाहीर केले की ते Instagram आणि Facebook च्या वेरिफाइड अकाउंटसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. वेबसाठी प्रति महिना 11.99 डॉलर (रु. 991.65) आणि मोबाईलसाठी प्रति महिना 14.99 डॉलर (रु. 1,239.77) द्यावे लागणार आहेत.
आता तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही ब्लू टिक्ससाठी पैसे द्यावे लागतील. सध्या हे फीचर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू करण्यात आलं आहे. लवकरच भारत आणि इतर देशांमध्ये देखील लागू केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतात याची किंमत किती असेल याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.
