
जळगाव मिरर । ८ जानेवारी २०२३
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अंमलात आणला. ही समिती भारतभर कार्यरत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे व उप राज्याध्यक्ष आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर काम चालू आहे.
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे भारतभर काम चालू असून या संकल्पनेतून ग्राहकांना न्याय मिळवून द्यायचा मंच उपलब्ध झाला आहे. तसेच ग्राहक संरक्षण समितीचे विदर्भ नागपूर विभाग अध्यक्ष राजेंद्र लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा अध्यक्षापदी वैशाली रमेश बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीतील सदस्य अधिकारी भारतभरातून सहभागी आहे. ग्राहकांना त्यांचे हक्क व त्यांची होणारी फसवणूक लक्षात यावी यासाठी वेळोवेळी कार्यशाळा तसेच योग्य मार्गदर्शन करून ग्राहकांना जागृत केले जाणार आहे. वेळोवेळी ग्राहकांना सूचित करण्याची यांची मानसा, अन्याय विरुद्ध आवाज उठवण्याचा पवित्रा व या क्षेत्रात काम करण्याची एक उमेद या सर्व बाबी लक्षात घेता. महिला विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षापदी वैशाली रमेश बाविस्कर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




















