जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३
राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असताना जळगाव जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली असता चिंचोली गावाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे साहित्य घेवून आलेले कंटेनर वादळात उलटल्याने त्याखाली दबले जावून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. भोला श्रीकुसूम पटेल (सानिकावा, जि.सिवान, बिहार) व चंद्रकांत वाभळे (52, चाळीसगाव, ह.मु.पुणे) अशी मयतांची नावे आहेत.
जळगाव तालुक्यातील चिंचाली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकाचा कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. रुग्णालयासाठीचे साहित्य घेवून कंटेनर (एन.एल.01 ए.ई.9426) हा उभा असताना गुरुवारी दुपारी अचानक वादळी वार्यासह पावसाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी कामावरील मजूर आधी शेडच्या आडोशाला उभे राहिले मात्र वादळात शेड उडाल्याने मजूर कंटेनरच्या आडोशाला आले मात्र वार्याचा वेग इतका वेगवान होता की कंटेनरही उलटला. या कंटेनरखाली दबले जावून दोघा मजुरांचा करूण अंत झाला तर अफरोज आलम (23, कुंडाळे, जि. पुरण्या, बिहार) हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली




















