
धानोरा ता.चोपडा : प्रतिनिधी
येथिल वास्तु ऊर्जातज्ञ किरण बाजीराव पाटील यांना वराहमिहीर ज्योतिष पुरस्काराने गौरविण्यात आले.सदर पुरस्कार हा अमेरिका सनातन धर्म व वैदिक ज्योतिष संघटना नागपुर यांच्याकडून देण्यात आला.पुरस्कारात त्यांना मेडल, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.
त्यांना जळगाव येथील अविनाश कुळकर्णी, पुण्याचे प्रविण कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे सतपंथ ज्योत मंदिराचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील, सुत गिरणीचे संचालक अनिल महाजन, माजी सभापती कल्पना पाटील, माणिकचंद महाजन, दिनेश पाटील, धनराज महाराज तसेच सतपंथ मंदिरातील मुखी परीवाराने अभिनंदन केले आहे.
पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचा पंकज विद्यालयात डॉ सुरेश बोरोले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.




















