जळगाव मिरर / ४ मार्च २०२३ ।
विवाहातील प्रत्येक प्रसंग आपल्या आठवणीत रहावा यासाठी आपण नेहमी व्हिडीओच्या माध्यमातून कैद करीत असतो अशाच वेळी अनेक विवाह सोहळ्यास उपस्थित असलेले आपले नातेवाईक देखील व्हिडीओ बनवीत असतात पण काही कालाताराने विवाहातील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर लग्नातील वधु वर यांना देखील धक्का बसत असतो असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मध्यतरी एका कपलने तर हद्दच केली त्यांनी लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ चक्क सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांचा भुवया उंचावल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर अजून एका वधूने मधुचंद्राच्या पहिला रात्रीचे क्षण सोशल मीडियावर शेअर केला. बेडरुममधील हा व्हिडीओ नेटकरी पाहून अवाक् झाले आहेत.
या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यात लोकांना याचं वेड लागलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बेडरुममधील पलंग वधू वराच्या मधुचंद्रासाठी फुलांनी सजवण्यात आलं आहे. लाल आणि गोल्ड रंगाच्या लंहग्यामध्ये नवरीचं रुप खूप खुलून दिसतंय. नववधूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. जरा घाबरलेली वधू हातात गुलाबाच्या फुलांच्या पाखळ्या घेऊन पलंगावर बसली आहे. काही क्षणात नवरदेव येणार आणि तिला मिठीत घेणार…असे काही स्वप्न ती मनात रंगवत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू वराची आतुरतेने वाट पाहत असताना अचानक वधूचा मूड बदलतो. ती नाचायला लागते आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद होतो.’आजा मुझे लेजा तेरी दुल्हन बना के’ या गाण्यावर वधूला नाचताना पाहून नेटकरी आपले भान हरपत आहेत. सुहागरातचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चार भिंतीमध्ये राहणारे क्षण या कपलने सोशल मीडियावर टाकून हद्द पार केली होती. पहिल्या रात्री वधू वर यांच्यामधील ते खासगी क्षण असे शेअर केल्यामुळे नेटकरी चिडले होते.
