जळगाव मिरर | ९ मे २०२४
तालुक्यातील नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट लिमिटेड येथे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात & जिल्ह्यात जनजागृती शासकीय यंत्रणेमार्फत मार्फ़त & विविध सेवाभावी संस्था मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आहे.
व्यासपीठावर युनिट हेड श्री बाला गिरिधर सर , एच आर हेड श्री रोहित जोशी सर,, गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन मदन रामनाथ लाठी आणि जळगाव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ,महात्मा गांधी स्काऊट पथक प्रमुख श्री गिरीश रमनलाल भावसार उपस्थित होते.
सुरवातीला परिचय श्री. सुदर्शन मोरे यांनी करून दिला त्यानंतर जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूक 2024 चे आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्त्व थोडक्यात पटवून दिले आणि १३ मे रोजी पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान करुन सोबत घरातील, आजुबाजुचे, नातेवाईकांना विनंती करून जसे आपण उत्सव साजरे करतो त्या प्रमाणे १३ मे हा साजरा करावा हि विनंती करून उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.
बीएलओ , स्काऊट शिक्षक ,महात्मा गांधी स्काऊट पथक प्रमुख श्री गिरीश भावसार यांनी आदरणीय जिल्हाधिकारी सरांचे मतदानाविषयी लोकशाहीच्या उत्सवाचे पत्राचे वाचन केले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान प्रक्रियेत झालेल्या बदलाची माहिती दिली, मतदार यादीत नाव शोधणे, SMS सुविधा समजावून सांगितली आणि उपस्थितांचे शंका निरसन केले.
