जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२३
ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनकार मंडळी वारसा जपत आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणिव भासत असल्याने वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे. सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जीवन सुकर होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार महत्वाचे असून वारकरी संप्रदायाचा विचार समाजाला तारू शकतो. नुसते वारकरी साहित्य वाटपापुरते नव्हे तर वारकरी संप्रदाय व धर्म कार्यासाठी नेहमीच कटिब्ध्द राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत ह.भ.प. कैलास महाराज चोपडाईकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव व जळगाव तालुक्यातील ५७ भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.*
देवाच्या आळंदीचा वारसा जपणारा जळगाव धरणगाव तालुका हा वारकरी संप्रदायात विखुरला आहे. ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे विविध कार्यक्रमाच्या माऊलींच्या हरिनामाचा गजर गावागावांत होत असतो. मात्र, याच हरिनामाला जोड लागते असं म्हणतात *लाऊणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्म रस आवडीने* म्हणून टाळ मृदंग विना व पेटी यांच्या खूप गरज असते हिच गरज ओळखुन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव व जळगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ५७ गावांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले. टप्या टप्याने मतदार संघातील प्रत्येक गावाला साहित्य वाटप होणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या महान पार्श्वभूमीवर साहित्य मिळाल्याने भजनी मंडळांनी आनंद व्यक्त केला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, संत आणि कीर्तनकारांच्या सानिध्यात राहिल्याने फायदा झाला. ग्रामीण भागात धार्मिक परंपरा टिकली पाहिजे. म्हणून हा भजनी मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रम हाती घेतला. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून जिल्ह्यातील वारकरी संप्रदायासाठी अभिवन उपक्रम राबविण्याची मनात इच्छा होती. जिल्हास्तरीय वारकरी भवन होणार असल्याने त्याचा भावी पिढीला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ती पूर्णत्वास येण्याचा मनस्वी आनंद आहे, असे सांगून ना.पाटील पुढे म्हणाले की, काही जण अशा कार्यक्रमावर टीका करतात. मात्र, अशा बदनामीला भिक घालत नाही. जिल्ह्यातील भजनी मंडळांना दर्जेदार साहित्य द्या, वारकरी संप्रदाय टिकेल कसा, असा सवाल निर्माण करीत जिल्ह्यात वारकरी संप्रदाय श्रीमंत कसा राहील,यासाठी प्रयत्न राहील. वारकरी मंडळींच्या कुटुंबात कोणी वारले तर त्या कुटुंबाला वारकरी मंडळातून आर्थिक मदत करता येईल,असेही त्यांनी सांगितले.
*याप्रसंगी ह.भ.प.गजानन महाराज यांनी तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम वारकरी करीत असतो. गुलाबभाऊंच्या माध्यमातून खान्देशाला उज्जवल नेतृत्व लाभले आहे. या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात टाळ, मृदृगाचा आवाजाचे पुण्य गुलाबभाऊंना लाभणार असल्याचे श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रचे अध्यक्ष तथा गौप्रेमी ह.भ.प.गजानन महाराज यांनी सांगितले. तसेच वारकरी संप्रदायाच्या परंपरा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आभारशाळेचे चेअरमन विक्रम (विक्की) पाटील यांनी मानले*
*वारकरी भवनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार !*
शिस्त,भक्ती आणि शक्तीचा उगम म्हणजे वारकरी संप्रदाय होय. वारकरी मंडळींसाठी वारकरी भवन उभारण्याचा मानस होता. आता जळगाव शहरातील खेडी परिसरात वारकरी भवनाच्या ६ कोटी ६ लक्ष्च्या मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रस्ताविकात माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की साधू,संत येती घरा,तोची दिवाळी, दसरा,असे म्हणत आज पाळधी त प्रती पंढरपूर झाले आहे. संतांचा वारसा टिकविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. आम्ही खारीचा वाटा उचला असून फिरत्या कीर्तन सप्हात ५७ भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य वाटपात मापात पाप होणार नाही. नारदाची गादी आहे, साहित्य वाटपाचे महत्व विषद करून समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वारकरी सांप्रदायाला सदैव सहकार्य राहणार असल्याची ग्वाही प्रतापराव पाटील यांनी दिली. तसेच जळगाव ग्रामीणमध्ये कीर्तन सप्ताह असेल तर त्या कार्यक्रमाच्या पत्रिका मोफत छापून देण्याचे आश्वासन प्रतापराव पाटील यांनी यावेळी दिले.
*यांची होती उपस्थिती*
याप्रसंगी ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे, ह.भ.प. देवगोपाल महाराज शास्त्री , ह.भ.प. बाबा परमहंस जी महाराज, ह.भ.प.चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प. भगवान बाबा धरणगावकर, ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकर, ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. प्रतिभाताई महाराज जवखेडेकर, जिल्हा प्रमुख निलेश पाटील , धरणगाव तालुका प्रमुख डी. ओ. पाटील , शिवराज पाटील, सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, जनाआप्पा कोळी, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सरपंच , वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.