
जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२४
वाघुर पंपीग व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा उदया दि.१२ रोजी महावितरण कडून दुरूस्ती केली जाणार असल्याने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उदद्या होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असुन मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
एक दिवस पाणी पुरवठा लांबल्याने शहरातील नियोजीत पाणी पुरवठ्याचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. उदया वाघूर पंपीग येथे धरणातून आलेल्या रॉ वॉटर जलवाहिनीवर स्लुईस व्हॉल व नॉन रिटर्न व्हॉल बसविण्यासह अन्य कामे करायची असल्याने मनपाने मनपाने शहरातील पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दि.१२ फेब्रुवारी रोजी होणारा पाणी पुरवठा दि.१३ रोजी होणार असुन दि.१३ रोजी होणारा पाणी पुरवठा दि. १४ रोजी व दि.१४ ला होणारा पाणी पुरवठा दि.१५ रोजी होणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे.