जळगाव मिरर | २० जानेवारी २०२५
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर आता महाविकास आघाडीतील ठाकरे गट आगामी स्थानिक निवडणुकीसाठी कामाला लागले आहे. तर नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री संजय राऊत यांच्यावर नाव न घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाणे येथील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ मैदानात हिंदूहृदयसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, समुद्रात बुडणाऱ्या त्या बोटीमधील 35 जणांचे प्राण आसिफ यांनी वाचवले, दुसरीकडे दुसऱ्या चोराला पकडणारा चेतन चौधरी आमचा शाखा प्रमुख आहे. सैफ आली खान यांच्या घरी चोरी करणारा चोर देखील ठाण्यात पकडला. ठण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू. आता पुढील मॅच ठाण्यात जिंकायची आहे. भलेही आम्ही दोन सामने गमावले असले तरी तिसरी मॅच महापालिकेची आम्हीच जिंकणार, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता दिसत आहे. त्यानुसार सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अधिवेशन पार पडले. यावेळी देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच नांदेड येथे देखील भाजप नेते व खासदार अशोक चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अशोक चव्हाण यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावर लढू, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच नांदेड शहरात तसेच जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे त्यामुळे इथली जागा भाजपलाच मिळावी असा आमचा आग्रह असणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.