जळगाव मिरर । ३१ डिसेंबर २०२२
देशात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जनता सज्ज झाली आहे तर न्यूझीलंडच्या ऑकलंड या सर्वात मोठ्या शहरात 2023 चा पहिला दिवस उगवला आहे. अवघ्या जगात 2022 ला थाटात निरोप देण्याची तयारी सुरू असताना येथील नागरिकांना मात्र नववर्षाचे सर्वप्रथम स्वागत करण्याची संधी मिळाली आहे.
यावेळी ऑकलंडच्या सुप्रसिद्ध स्काय टॉवरला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. ऑकलंडमधील स्काय टॉवर शहारतील सर्वात लोकप्रिय इमारतींपैकी एक आहे. ती 25 वर्षे जुनी असून, 328 मीटर उंच आहे.
ऑकलंड हे न्यूझीलंडचे सर्वात मोठे शहर आहे. उत्तर बेटावरील या शहरात न्यूझीलंडची तब्बल 31% लोकसंख्या राहते. येथील नागरिकांनी शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 च्या ठोक्याला 2023 चे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. यावेळी ऑकलंडच्या सुप्रसिद्ध स्काय टॉवरला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. ऑकलंडमधील स्काय टॉवर शहारतील सर्वात लोकप्रिय इमारतींपैकी एक आहे. ती 25 वर्षे जुनी असून, 328 मीटर उंच आहे.