
जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२५
राज्यातील पालघर जिल्ह्यातील मेडले फॉर्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत गुरुवारी संध्याकाळी उशिरा नायट्रोजन वायूची गळती झाली. या अपघातात गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपनीच्या प्लँट क्रमांक एफ-13 मध्ये औषध निर्मिती प्रक्रिये दरम्यान नायट्रोजन वायूची गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या मेडले (मेडली) फॉर्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत गुरुवारी संध्याकाळी उशिरा एक मोठा अपघात झाला. कंपनीच्या प्लँट क्रमांक एफ-13 मध्ये औषध निर्मिती प्रक्रिये दरम्यान सहा कामगारांना नायट्रोजन वायू गळतीचा त्रास झाला. या अपघातात गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फार्मा कंपनीत अल्बेंडाझोल औषध तयार केले जात होते. या दरम्यान नायट्रोजन वायू मिसळताना अचानक गळती झाली. वायूच्या संपर्कात आल्यानंतर कामगार बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये कमलेश यादव, कल्पेश राऊत, धीरज पवार आणि बंगाली ठाकूर यांचा समावेश आहे. त्याच वेळी रोहन शिंदे आणि नीलेश आदळे यांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. अपघातानंतर कंपनी परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीत हा अपघात झाला. मेडली फार्मास्युटिकल कंपनी तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक F13 मध्ये आहे, जिथे हा अपघात झाला. गॅस गळतीमुळे सहा कामगार बेशुद्ध पडले, त्यापैकी चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर दोघांना तातडीने येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात कसा झाला, गॅस गळतीचे नेमके कारण काय आहे? या बाबत तपास अजूनही सुरू आहे.
अपघातानंतर फार्मा कंपनीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी काम करणारे कामगार कंपनी सोडून पळू लागले. कंपनीतून बाहेर पडलेल्या लोकांनी सांगितले की नायट्रोजन गॅसची अचानक गळती झाली. आमच्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. गॅस पसरण्यापूर्वीच आम्ही बाहेर पडलो. तथापि, कंपनीच्या अग्निशमन दलाने वेळीच गॅस गळती आटोक्यात आणली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.





















