महाराष्ट्रात मोठ्या सत्ता संघर्षानंतर भाजपच्या पाठींब्याने शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सर्वानी पाहिलं.. मग देवेंद्र फडणवीस हे उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री (fadnavis deputy chief minister of uttar pradesh) हे ऐकून तर तुम्हाला धक्काच बसला असेल. हा सर्व गोंधळ गुगलमुळे (Google) झालाय.त्यामुळे हे कुणी केल हेच समजे नासे झाले आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र, असे असतानाही राज्यात अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीवारी वारंवार सुरू आहे. सध्या देखील शिंदे आणि फडणवीस हे दोघे दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.
30 जुनला घेतली शपथ
फडणवीसांनी 30 जूनला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून अडीच वर्षे काम केले आहे. ठाकरे सरकारला त्यांनी अनेक मुद्द्यांवरून त्यांनी घेरले होते. विरोधी पक्षनेते होण्यापूर्वी फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या कालावधीत फडणवीसांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले.