प्रत्येक महिला असो वा पुरुष सर्वांना सोन्याच्या दागिन्याचे खूप आकर्षण असते पण कधी कधी सोन्याच्या दरात होणार दरवाढ लक्षात घेता सर्वाना सोने घेणे परवडत नसते पण त्यावर आता पर्याय निघाला आहे. घरामध्ये ठेवलेले सोने चोरीला जाण्याची अथवा हरवण्याची नेहमीच भीती असते. अशा परिस्थितीत डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून उदयास आले आहे. आता तर डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीसाठी लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय देखील ठरले आहे.
हे जाणून घ्या कि, Digital Gold हे ऑनलाइन सोने खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. यामध्ये सोने आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवले जाते. याशिवाय आपल्याला त्याची खरेदी आणि विक्री देखील करता येऊ शकते. याशिवाय गरज पडल्यास काही अतिरिक्त शुल्क भरून हे डिजिटल गोल्ड फिजिकल सोन्यामध्ये देखील कन्हव्हर्ट करता येते.
आता आपण घरबसल्या फक्त 1 रुपयामध्ये शुद्ध सोने खरेदी करू शकाल. ऑनलाइन सोने खरेदी करणे सोपे देखील आहे. याशिवाय आपल्याला ते हवे तेव्हा ते ऑनलाइन विकता देखील येते. यासाठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. ज्याद्वारे आपल्याला Digital Gold खरेदी करता येईल.
सध्याच्या काळात डिजिटल पेमेंट Apps चा वापर प्रचंड प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत गुगल पे,फोनपे आणि पेटीएम सारख्या लोकप्रिय पेमेंट Apps द्वारे Digital Gold खरेदी करता येईल. इथे फक्त 1 रुपयांतही शुद्ध सोने मिळू शकेल.
Paytm द्वारे अशा प्रकारे खरेदी करा डिजिटल गोल्ड
Paytm द्वारे Digital Gold खरेदी करण्यासाठी सर्वात आधी पेटीएम ऍप उघडावे लागेल. ज्यानंतर सर्च बारमध्ये गोल्ड टाइप करा. यानंतर पेटीएम गोल्डच्या पर्यायावर क्लिक करून हवे तेवढे सोने खरेदी करता येईल. इथे सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त त्याची विक्री, डिलिव्हरी आणि गिफ्ट्सचा पर्याय देखील मिळेल. जर आपल्याला सोने विकायचे असेल तर सेलच्या बटणावर क्लिक करावे लागेल. तसेच गिफ्ट करण्यासाठी गिफ्टचा पर्याय निवडावा लागेल. त्याच वेळी, आपल्याला ऑनलाइन सोन्याची नाणी देखील खरेदी करता येतील. ज्याची होम डिलिव्हरी देखील मिळू शकेल. पेटीएम व्यतिरिक्त अनेक पेमेंट प्लॅटफॉर्म कडून ग्राहकांना ही सुविधा दिली जाते आहे.
