जळगाव मिरर / १० मार्च २०२३ ।
राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना अनेक गुन्हेगारीच्या प्रमाणात महिलासह मुलीवर अत्याचारांच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल देण्याचं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
चार जणांनी या मुलीवर बलात्कार केला. चारपैकी दोन जण पीडितेचे मित्र होते. यापैकी दोन आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर अन्य दोन आरोपींची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोबाईलचं आमिष घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यातील आहे. आरोपींपैकी दोन जण या मुलीचे मित्र होते. या मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सुरुवातीला तिच्या मित्राने तिला घरी बोलावलं. पीडिता घरी आल्यानंतर तिला दुचाकीवर बसून हुबळी रिंगरोड परिसरातील एका निर्जळ ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यावेळी आरोपींनी पीडितेला मारहाण केल्याची माहिती देखील समोर येत आहे.गुन्हा दाखल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणातील दोन आरोपींची ओळख पटवण्यात यश आलं आहे, तर अन्य दोन आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
