
जळगाव मिरर | ८ मे २०२५
राज्यातील महायुती सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली होती. आता या लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता जमा झाला असून मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच आता महायुतीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी 2100 रुपयाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळणार आहेत. 1500 रुपये व्यवस्थित मिळाले की 2100 पण मिळतील. असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच नवीन योजना आहे. शंका कुशंका उपस्थित करू नये, असंही छगन भुजबळांनी स्पष्ट केलं.
छगन भुजबळ म्हणाले, लाडकी बहीण योजनेत अडचणी आहेत. घरात एखाद्या वेळी खर्च वाढतो तसेच आहे. काही वेळा उशिरा पैसे येतात. शासकीय पैसे कुठेही जात नाही. लाडकी बहीण, लेक लाडकी योजनेचे पैसे इकडे गेले तिकडे गेले तेव्हा इतर मंत्री ठणाणा करतात. लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळणार आहेत, असं भुजबळ म्हणाले.
तसेच लाडक्या बहिणींना 1500 रुपये व्यवस्थित मिळाले की, 2100 पण मिळतील. नवीन योजना आहे. शंका कुशंका उपस्थित करू नये, असं म्हणत छगन भुजबळ यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.




















