जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२३
राज्यात समृद्धी महामार्गावर गेल्या काही वर्षापासून अपघातांची मालिका सुरुच असून आज पुन्हा एकदा याच महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला खासगी बस धडकल्याने समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्शनासाठी नाशिकमधील काही भाविक खासगी बसने गेले होते. मात्र मध्यरात्रीच या भाविकांवर काळाने घाला घातला. अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून यामधे चार महिन्याच्या बालकाचादेखील समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अपघातात वीस जण जखमी झाले आहेत. हा अपघात वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर झाला. समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला भाविकांच्या खासगी बस धडकली असल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. वैजापूर येथील शासकीय रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. यातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती कळाली आहे.
मयतांची नावे
1) तनुश्री लखन सोळसे (वय 5 वर्षे) समता नगर, नाशिक 2) संगीता विलास अस्वले (40) वनसगाव, तालुका निफाड, नाशिक 3) पंजाबी रमेश जगताप (38) राजू नगर, नाशिक 4) रतन जमदाडे (45) संत कबीर नगर, वैजापूर 5) काजल लखन सोळसे (32) समता नगर, नाशिक 6) रजनी गौतम तपासे (32) गवळणी, नाशिक 7) हौसाबाई आनंदा शिरसाट (70) उगाव, निफाड, नाशिक 8) झुंबर काशिनाथ गांगुर्डे (58) राजू नगर, नाशिक 9) अमोल झुंबर गांगुर्डे (18) राजू नगर, नाशिक 10) सारिका झुंबर गांगुर्डे (40) राजू नगर, नाशिक 11) मिलिंद हिरामण पगारे (50) कोकणगाव, ओझर 12) दीपक प्रभाकर केकाने (वय 47) बसवंत पिंपळगाव, नाशिक
जखमीची नावे
दगू सुखदेव म्हस्के, गौतम भास्कर तपासे, कार्तिक ( लहान मुलगा), शांताबाई नामदेव मस्के, दुर्गा (लहान मुलगी), धनश्री लखन सोळसे, लखन शंकर सोळसे (वय 33), सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन, श्रीहरी दीपक केकाने (वय 12), सम्राट दीपक केकाने (वय 6), संदेश संदीप अस्वले (वय 11),अनिल साबळे (वय 30), प्रकाश हरी गांगुर्डे (वय 24) , तन्मय लक्ष्मण कांबळे (वय 10), संदीप रघुनाथ अस्वले (वय 40), युवराज विलास साबळे (वय 28), गिरजेश्वरी संदीप अस्वले (वय 9), पूजा संदीप अस्वले (वय 38), वैशाली संदीप अस्वले (वय 14) ,ज्योती दीपक केकडे अशी जखमींची नावे आहेत. जखमींमध्ये आणखी तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांची नावे अजून कळू शकले नाहीत.