जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२५
समाजात ‘पोलीस’ नावाचा चांगलाच दरारा असतो मात्र गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्हा पोलीस दल विविध करणाच्या माध्यमातून चर्चेत येत आहे. कधी आरोपी सोबत फोटो तर कधी लाचखोरीच्या घटना जिल्ह्यात नेहमीच होत असतांना आता चक्क महिला पोलीसने पोलीस महिलांसह काहीना आर्थिक चुना लावल्याची घटना उघड झाली आहे. सोन्यामध्ये गुंतवणुक करुन त्यातून अधिकचा नफा मिळविण्याचे अमिष दाखवित अर्चना प्रभाकर पाटील या महिला पोलीसाने तिच्या दोन सहकाऱ्यांना ३० लाखात गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला. अशाच पद्धतीने अर्चना पाटील हीने चौघुले प्लॉट येथील ललिता दीपक येशे (वय ४०) या महिलेला ४ लाखांचा चूना लावल्याचे उघड झाले. त्या महिलेने शनिवारी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित अर्चना पाटील हिच्याविरुद्ध दुसरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील चौघुले प्लॉटमधील ललिता येशे या खासगी नोकरी करुन उदनिर्वाह करतात. फ्रेबुवारी २०२४ मध्ये त्या शहरातील एका ब्यूटी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी गेल्या होत्या. तेथे तत्कालीन एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली अर्चना रविंद्र पाटील यांच्योबत ओळख झाली. त्या महिला पोलीसाने मी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या मैत्री झाली. त्यानंतर त्या दोघी व्हॉट्सअॅप कॉलवर एकमेकांच्या संपर्कात होत्या. दि. १ एप्रिल २०२४ रोजी अर्चना पाटील यांनी ललिता येशे यांना भेटण्यासाठी बोलावले. त्याठिकाणी तीने चांगली बेनीफिट मिळणारी योजना आहे.
सध्या सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सोनार व्यावसायीक असलेले माणिक जोहरी, जितूजी, मयूर वाणी, महावीर ज्वेलर्स अशांचा ग्रुप आहे. आम्ही सर्वजण दुबईवरुन सोने कमी भावात आणून ते इथे सोनारांना जास्त भावात विकतो असे सांगितले. यापुर्वी अनेकांना गुंतवणूकीतून पैसे कमवून दिले, तू माझी चांगली असून या स्किममध्ये चार लाख रुपये टाक, सहा महिन्यात तुला डबल करुन देईल. त्यामुळे तूझी परिस्थिती सुधरुन जाईल असे अमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून ललिता येशे यांनी दि. १५ एप्रिल रोजी ४ लाख रुपयांची रोकड अर्चना पाटील यांच्याकडे दिली.
खात्री झाल्यानंतर ललिता येशे या घाबरुन गेल्या होत्या. परंतु शुक्रवारी दोन महिला पोलिसांनी अर्चना पाटील हीने फसवणुक केल्याची बातमी वृत्तपत्रात वाचल्यानंतर ललिता येशे यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित महिला पोलीस कर्मचारी अर्चना पाटील यांच्याविरुद्ध दुसरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.