जळगाव मिरर / ५ मार्च २०२३ ।
अनेक वर्षापासून राज्यातील प्रत्येकाच्या घराघरात जाऊन मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’. या मंचावरून होणाऱ्या विनोदाच्या आतिषबाजीने प्रेक्षकांना प्रेक्षकांना भरभरून हसवले. हा कार्यक्रम घराघरातील अविभाज्य घटक बनला आहे.
या मंचावर एकशे एक विनोदवीर आहेत. ते कलाकार आणि त्यांनी साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. म्हणून गेली अनेक वर्ष या कार्यक्रमाची जादू आहे. पण सध्या हा कार्यक्रम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात गेली कित्येक दिवस एक कलाकार दिसत नाहीय. तो म्हणजे अभिनेता सागर कारंडे. त्याने साकारलेले महिला पात्र असो किंवा पोस्टमन, त्याचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिले आहे. गेले कित्येक दिवस तो दिसत नसल्याने सागरने ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सोडला अशी चर्चा आहे.
आता खरच सागरने मालिका सोडली का? की तो सध्या इतर कामांमध्ये व्यस्त आहे यावर स्वतः सागर आणि वाहिनी कुणीच स्पष्ट बोललेलं नाही. त्यामुळे सागरच्या नसण्याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने सहा महिन्यांपूर्वीच ‘चला हवा येऊ द्या’ ला रामराम केला आहे. त्यानंतर तो ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात आला. पण सध्या तो ‘चला हवा देऊ द्या’चा भाग नाहीय. यावरून सोशल मीडियावर मात्र बरंच उधाण आलं आहे.कारण झालं असं की, सागर करत असलेलं पोस्टमन हे पात्र आता अभिनेत्री श्रेया बुगडे साकारत आहे. याच पात्रावरून आता सोशल मिडियावर नाराजीचा सूर उमटत आहे.
नुकत्याच एका भागत श्रेयाने हे पात्र साकारलं. त्यावरून सागर आता ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नाही त्यावर शिक्कामोर्तब झाली. पण ही बाब प्रेक्षकांना मात्र चांगलीच खटकली आहे. सागर शो मध्ये का नाही? त्याला परत आणा? सागर शिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून उमटत आहेत.




















