
जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२५
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर जळगाव शहरातील दोन बंधूवर देखील आरोप केले आहे.
आमदार चव्हाण म्हणाले की, जर जनतेला पोलिसांना काही काम सांगायचे असेल तर जनता आमदारांना न सांगता थेट आयुष सारख्या दलाला पकडून त्याला पोलिसाचे काम सांगणार. त्या महिलेचे आयुषकडे लोकेशन आले तरी कसे. जर बाहेरचे लोक यंत्रणा हातात घेऊन चालवत असतील तर कसं काय चालणार यास अनेक गंभीर आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी बैठकीत केले आहे.
धनदांडग्याच्या पोरांना विशेष सूट ?
गेल्या २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली होती. यावेळी आ.चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर हे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यत आ.चव्हाण एमआयडीसी पोलिसात ठाण मांडून होते. मात्र यात अद्याप कुठलीही नोंद झालेली नाही व त्या दोन बंधूंची चौकशी देखील झालेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात आता आ.मंगेश चव्हाण यांनी दोन बंधूवर केलेले आरोप खरे असल्याची चर्चा जळगाव शहरात रंगू लागली आहे. जर याच ठिकाणी सर्व सामान्य व्यक्ती असता तर त्याला पोलिसांनी अद्याप बेड्या देखील ठोकल्या असत्या मात्र धनदांडग्याच्या पोरांना पोलिसांनी देखील सूट दिली आहे का ? अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
पुढील भागात पाहूया : ‘या’ प्रकरणात मोठी सेटलमेंट झाली का ?
आ.चव्हाण यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का ?तुमच्या भावना व्यक्त करा जळगावकर !
🔗 आताच तुमच्या भावना कमेंट करा
https://www.facebook.com/share/p/1A1TwaA4Fd/




















