जळगाव मिरर | २३ मार्च २०२५
भुसावळ शहरातील हद्दपार गुन्हेगार मुकेश भालेराव याचा खून करून त्याचे शव तापी नदीच्या किनारी फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यामध्ये दोन महिला आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. भालेरावच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान जिल्हा न्यायालयाने दोन महिलांना दि.२६ पर्यंत कोठडीत तर अल्पवयीनांना बाल निरीक्षण गृहात पाठविण्याचे आदेश दिले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१, रा. टेक्निकल हायस्कूल मागे, भुसावळ) हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याला नाशिक येथे स्थानबद्ध केले होते, तसेच भुसावळ शहरातून हद्दपार केले होते. होळीच्या दिवशी रात्री तो भुसावळमधील आपल्या घरी परत आला होता. मुकेश भालेरावच्या दुसऱ्या पत्नीला १७ वर्षांची एक मुलगी आहे. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, मुकेशने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या कारणावरून त्याचा राहत्या घरातच खून करण्यात आला. त्यानंतर शव तापी नदीच्या किनारी टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
खोदकाम करुन मृत मुकेश भालेरावचा मृतदेह मांडी मारलेल्या व पालब्या अवस्थेत पुरला होता. हा मृतदेह मृताचा भाऊ शिवा भालेराव यानेच बाहेर काढला, मृतदेह पुरुन आठवडा झाल्याने मृतदेह कुजला होता. यामुळे बाहेर काढता बरोबर दुर्गंधी पसरली. मृताच्या अंगावर केवळऍन्ट शिल्लक होती. दरम्यान हातात असलेल्या दोऱ्यावरुन तसेच उंचीचा अंदाज घेवून शिवा याने हा मृतदेह भाऊ मुकेश याचाच असल्याचे सांगून ओळख दाखवली. मुकेश भालेराव हा हद्दपार गुन्हेगार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तो हद्दपार असतानाही शहरात आला कसा ? असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. यापूर्वीही हद्दपार असलेले गुन्हेगार शहरात कोणाच्या आशीर्वादाने फिरतात, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.




















