जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२५
राज्यातील महायुती सरकारला निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना मोठी प्रभावी ठरली होती. मात्र आता या योजनेत मोठी अपडेट समोर आली आहे. महायुती सरकार पुन्हा राज्यात आल्यास लाभार्थी महिलांना १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले त्यामुळे २१०० रूपये कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे या योजनेचा सरकसकट नियम आणि निकषांचा विचार न करता निकष धुडकावून अपात्र ठरणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते.
यानंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यातून दंडासह योजनेची रक्कम परत घेतली जाणार? अर्जांची छाननी, पडताळणी सुरू असताना जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार का? असे सवाल असताना दरम्यान या योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मात्र अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याची मोठी माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिली.