अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील मुख्य रस्त्यावर पायी जात असतांना एका ३९ वर्षीय महिलेची दोन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील स्टेशन रोड परिसरातील लोकसेवा झेरोक्स समोरील रोडवर दि २८ रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पटवारी कॉलनीतील रहिवासी असलेले वंदना गणेश पाटील (वय ३९) या पायी पाणीपुरी खाण्यासाठी जात असताना दोन भामटे दुचाकीने राँगसाईटने येत त्यांच्या गळ्यातील ३ ग्राम वजनाचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी महिलेने थेट अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सफौ.बापू साळुखे हे करीत आहेत.