जळगाव मिरर | ८ मार्च २०२५
आज दिनांक ८ मार्च शनिवार रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर, डॉ आनंदीबाई जोशी, स्व प्रेमाबाई जैन आदि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी महिलांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा सुरेशजी कोते यांनी भूषवीले तर रेड स्वस्तिक राष्ट्रीय अध्यक्ष तथा लिज्जत पापडचे सर्वेसर्वा मा अशोकजी शिंदे साहेब, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर तथा राज्य सचिव प्रकाशदादा पाटील, जे बी पाटील एडवोकेट राजेश झाल्टे, डॉ शमा सराफ, डॉ सोनल इंगळे, डॉ धनंजय बेंद्रे ,नंदूभाऊ रायगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .यावेळी उडान फाउंडेशनच्या संचालिका हर्षाली चौधरी, माय माती फाउंडेशन अमळनेर, डॉ गीतांजली ठाकूर एरंडोल, सौ पुष्पा रमेश पाटील जामनेर, सौ सपना राजपूत जामनेर, डॉ नीलिमा शेठीया जळगाव, अश्विनी भगवान बाविस्कर ,सौ पुनम एकनाथ पाटील मुक्ताईनगर, सुनीता धर्मेंद्र चौधरी जामनेर ,मीन साखळीकर जळगाव, पूर्वा किशोर पाटील पाचोरा, छाया बोरसे जळगाव, शुभांगी पराग बडगुजर, जळगाव रूपाली प्रमोद पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यासोबतच रेड स्वस्तिक सचिव डॉ गणेश पाटील,श्री राहुल सूर्यवंशी कॅन्सर हॉस्पिटल नाशिक, सौ मनीषा पाटील नारीशक्ती, बहुउद्देशीय संस्था जळगाव , डॉ केतकी पाटील,डॉ धनंजय बेंद्रे ,अशोक शिंदे, सुरेश कोते यांनी मनोगतातून महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी वंदना मंडावरे ,आशा मौर्य, नूतन तासखेडकर , नेहा जगताप, नीता वानखेडकर, हर्षाली तिवारी, हर्षा गुजराथी शिल्पा बयास उपस्थित होते .सूत्रसंचलन मंजुषा अडावदकर यांनी व आभार प्रमोद आमोदकर यांनी मांडले.