जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२३
राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. आम्ही आरोप केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दोन मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या संदर्भात राज्य सरकारमधील ‘यह डर अच्छा लगा’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला डिचवले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार हल्ला केला. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री जनतेच्या पैशावर परदेश दौरे करत आहेत. पण तिथे जाऊन ते नेमके करणार काय आहेत? कोणाला भेटणार आहेत? कोणत्या कंपन्यांना भेट देणार आहे? याची माहितीच नाही. त्यामुळे हे दौरे म्हणजे सुट्ट्या समजायला लागले आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.