
जळगाव मिरर । ६ फेब्रुवारी २०२३।
मुस्लिमांविरोधात केलेलं वादग्रस्त विधान योगगुरु बाबा रामदेव त्यांना भोवलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानातील बारमेर इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी २ फेब्रुवारी रोजी हे विधान केलं होतं. याप्रकरणी रामदेव यांच्याविरोधात काल गुन्हा दाखल झाला होता.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात संतांच्या मेळाव्यात चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल शत्रुत्वाला प्रोत्साहन आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल (बाबा रामदेव द्वेषयुक्त भाषण) योगगुरू रामदेव यांच्याविरुद्ध रविवारी एफआयआर दाखल करण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक रहिवासी पठाई खान यांच्या तक्रारीच्या आधारे चौहान पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
२ फेब्रुवारी रोजी झालेल्या संतांच्या बैठकीत रामदेव यांनी हिंदू धर्माची इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माशी तुलना करताना मुस्लिमांवर दहशतवादाचा आणि हिंदू महिलांचे अपहरण केल्याचा आरोप केला. त्यांनी आरोप केला की दोन्ही धर्म धर्मांतराचे वेड आहेत, तर हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगले करायला शिकवतो.




















