
जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत आहे तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ देखील अनेक जिल्ह्यात जंगी सभा घेत मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल करीत आहे. आज पुन्हा एकदा मंत्री भुजबळ यांनी थेट मनोज पाटलांवर पुण्यात हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात अशांतता कोण निर्माण करत आहे. आंतरवाली सराटीत महिला पोलिसांवर हल्ला झाला. त्यानंतर पोलिसांनी तेथील लोकांनी बचावत्मक कारवाई केली. जमाव हिंसक झाला तेव्हा पोलिसांनी वाजवी बळाचा वापर केला, असे फडणवीस म्हणाले. मी दोन महिन्यांपासून सांगत होतो. पण कोणी ऐकायला तयार नाही. एवढी सहानुभूती मिळाली नसती. या राज्यात अशांतता कोण माजवते? असा प्रश्न देखील मंत्री भुजबळांनी उपस्थित केला.
भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, तो तर म्हणतो की,(मनोज जरांगे) सर्वांना सरसकट प्रमाणपत्र द्या, मराठ्यातील अन्य नेते गप्प का, बोलाना? हर्षवर्धन पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र हवं का, यासह अन्य नेत्यांना कुणबी प्रमाणपत्र हव का ? आमचा विरोध झुंडशाहीला आहे, मराठा समाजाला आमचा विरोध नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. ओबीसीमध्ये अति मागास आहे. त्यांच्यासाठी कोणाला जाता येत नाही. त्यामुळे सत्तीस टक्यामधून 17 टक्के मध्ये 170 प्रश्न आहे. आमचे आमचे आरक्षण २७ टकक्के भरा, मग बाकीच्यांचे बघा, ओबीसींना अजिबात नोकऱ्यामध्ये संधी नाही. लोकसेवा आयोगात 85 भरती मराठा समाज, ईडब्यूएसमध्ये 85 टक्के मराठा समाज आहे. मराठा समाजाला तेवढं दिले आम्हाला तेवढं द्या, आमच्या आरक्षणाला अजिबात धक्का लावू नका, अशी मागणी आहे.
तर हे लोक आमची लायकी का काढणार? आमची लायकी काढली जातेय, आमदार नारायण कुचे यांच्यावर मनोज जरांगे यांनी शारिरीक व्यंग केले. त्यावरुन छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला. जरांगेंचा ऑडिओ क्लिप ऐकून भुजबळांनी जोरदार हल्लाबोल केला. तू तर अकलैने दिव्यांग झालास. मनोज जरांगे म्हणजे अकलेने दिव्यांग झालेला माणूस. लोक कशाला घाबरत आहात. सरकारी अधिकारी यांनी त्रयस्त भूमिका घ्या,