
जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२
शहरातील शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे आज दि १० ऑक्टोबर रोजी जळगाव महानगर पालिकेच्या परिसरात शिंदे गटाचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विष्णू भंगाळे, शरद तायडे यांनी केले.
काय म्हणाले नेते गुलाबराव वाघ ?
ज्या हिंदुस्थानमध्ये शिवसेना जन्माला आली त्या दिवसापासून कॉंग्रेसने सुद्धा जो प्रयन्त केला नव्हता तितका प्रयन्त भारतीय जनता पार्टी आता करत आहे, या गद्दारांच्या खाद्यावर बंदूक ठेवून, चिन्ह जरी गोठविले असेल तरीसुद्धा हिंदुस्थानातील जनतेच्या हृदयातून हे चिन्ह गोठवू शकत नाही, येणाऱ्या निवडणुकीत हि जनता गद्दारांना जागा दाखविली, हा सर्व रडीचा डाव आहे, हिदुस्थानातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शिवसेनेसमोर असे संकटे येत राहतात बाळासाहेबांचे विचार घेवून चालणारे शिवसैनिक यांना संकटे मोठे वाटत नाही, येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना जनता जागा दाखविणार असा टोलाही यावेळी वाघ यांनी शिंदे गटाला लगाविला.
या आंदोलनात मंगला बारी, सुनील ठाकूर, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, अमित जगताप, पियुष गांधी, प्रशांत सुरळकर, विशाल वाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




















