जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५
जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, आकाश संजय पाटील या युवकाने पाच जणांच्या मानसिक त्रासाला कंटाळून २७ ऑगस्ट २०२५ रोजी शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आरोपींची नावे स्पष्टपणे नमूद केली असून, त्यापैकी चार जण पोलिस कोठडीत आहेत. मात्र मुख्य आरोपी राजकीय प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे अद्याप मोकाट फिरत असून, त्याच्या अटकेसाठी मृताच्या पालकांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मी उपरोक्त नमुद अर्जदार संजय पांडूरंग पाटील व लताबाई संजय पाटील कायम स्वरुपी रांजणी ता. जामनेर जि. जळगांव यांचा मुलगा (मयत) आकाश संजय पाटील वरील आरोपी नं. १ ते ५ यांच्या त्रासाला कंटाळून तसेच वारंवार जिवे मारण्याच्या धमकी दिल्यामुळे मयत आकाश संजय पाटील याला मजबूर करुन त्याने दिनांक २७/८/२०२५ रोजी मौजे रांजणी शिवार ता. जामनेर जि. जळगांव येथील गट नं. ८९ या शेतात सकाळी १० ते १२.३० वाजेच्या दरम्यान गटफास घेवून आत्महत्या केली.
आत्महत्या करणेचे अगोदर त्याने आपल्या हस्ताक्षरात एक चिट्ठी लिहून ठेवली त्या चिठ्ठी मध्ये वरील पाच आरोपींची नावे नमुद केलेली असून त्यापैकी आरोपी नं. २ ते आरोपी नं. ५ हे आज रोजी पोलीस कस्टडीमध्ये असून मुख्यआरोपी नं. १ राजू अजमेरे हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून त्याने आजपर्यंत गावात बऱ्याच निष्पाप व निरपराध लोकांना विनाकारण धमक्या, खोट्या केसेस देवून काम केलेले आहे. तो आधीपासून गुंड पृवत्तीचा असून त्याने अगोदार त्याच्या मामावर अॅसिड हल्ला करुन जिवे मारले आहे. तसेच त्याच्या स्वतःच्या भावाला नामे संजय विठ्ठल अजमीरे (मयत) याला शेताच्या वादातून आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. तरी सदरील व्यक्ती हा अजून कित्येक लोकांचा जिव घेईल यांचा काही नेम नाही. तसेच मयत आकाश संजय पाटील याच्या आत्महत्येस जवळपास ६ ते ७दिवस झाले असून हा आरोपी नं. १ हा बाहेर मोकाट फिरत आहे.
यामागे त्याला काही राजकीय सपोट मिळकत आहे. तरी मयत आकाश हा घरातील कर्ता युवक होता त्याच्या पश्चात आई आणि वडील हे वयोवृध्द असून त्याच्यावर घराची सर्व जबाबदारी होती. तरी महोदयाना विनंती की, वरील आरोपी नं. १ याच्या पासून मयत आकाश यांचे नातेवाईक यांना सुध्दा धोका निर्माण होवू शकतो याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी लवकरात लवकर आरोपी नं. १ याचा तपास करुन त्याला तात्काळ अटक करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.