
जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२३
राज्यातील अनेक तरुण तरुणी आपले प्रेम सत्यामध्ये उतरत नसल्याने कुठल्या टोकावर जातील हे कोणीही सांगू शकत नाही. अशा घटना देखील नियमितपणे उघडकीस येत असतात. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात घडली असली देखील हे प्रेमप्रकरण आहे कि दुसरे काही अजून यावर कुठेली हि माहिती समोर आलेली नाही. एका तरुणाने आपल्या व्हाट्सअप स्टेटसला तुझ्यात आठवणीत सोबत जगत राहील पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही असा संदेश देत वारणेच्या पुरात उडी घेतल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे आजोळी २४ वर्षीय तरुण तुषार पांढरबळे हा वास्तव्यास असून तो एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत आहे. तालुक्यातील वारणा नदीवरील मांगले आणि सावर्डे बंधाऱ्यावरून तुषार यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवत उडी मारली असून ही घटना शनिवारी घडल्यानंतर रविवारी दिवसभर एनडीआरएफच्या पथकामार्फत तीन मोठी च्या मदतीने पुलापासून पाच किलोमीटर अंतरावर शोध मोहीम सुरू होती मात्र बेपत्ता तरुणाचा तपास लागलेला नाही यामुळे सायंकाळी ही मोहीम थांबविण्यात आली होती.




















