
जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राऊत म्हणाले, “हे सरकार कमजोर, आणि दुबळं सरकार आहे.कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रांच्या वर्मावर घाव घातला होता. शिंदे सरकारला लाज वाटली पाहिजे. ‘४० गावे कर्नाटकात जाणार नाही, असं म्हणून चालणार नाही,’ तर त्यावर ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. सरकार गुडद्यावर बसलं आहे. स्वाभीमानी ४० आमदारांचा स्वाभीमान कुठे गेला. त्यांनी कुठे शेण खाल्लं,”अशा तिखट शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. शिंदे फडणवीस यांच्या सरकारवर त्यांनी टीका केली आहे. दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. एकनाथ शिंदे यांनी यासाठी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात आले होते. तसेच साईदर्शनानंतर एकनाथ शिंदे सिन्नरच्या मिरगावात गेले आणि तिथे एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतलं. अशा स्वरूपाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व घटनेवर खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यासह सरकारवरती टीका केली आहे. राऊत बोलताना म्हणाले की, ‘सध्याचं सरकार हे देवधर्म, ज्योतिष यांच्यात अडकलं आहे अशा शब्दात राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (बुधवारी) शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सिन्नर येथे एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा आहे.