
जळगाव मिरर / २२ फेब्रुवारी २०२३ ।
युवासेना कॉलेजकक्ष जळगाव जिल्ह्यातर्फे जळगाव शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजप खासदार अनिल बोंडेचा जाहीर निषेध करण्यात आला. 19 फेब्रुवारी 2023 रोजी अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित शिवव्याख्यानादरम्यान शिवव्याख्याते तुषार उमळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडत होते. या कार्यक्रमात भाजप खासदार अनिल बोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवव्याख्यानाच्या एका प्रसंगादरम्यान अनिल बोंडे यांनी शिवव्याख्याते तुषार उमळे यांना “तू मुर्ख आहे का? तुला अक्कल आहे का?“ असे बोल सुनावले व शिवराळ भाषेत सार्वजनिकरित्या अपमान केला. शिवव्याख्याते तुषार उमळे यांनी लागलीचच अनिल बोंडे यांचा चांगला समाचार घेतला.
युवासेना कॉलेजकक्ष तर्फे खासदार अनिल बोंडे यांचा जुते मार आंदोलन करीत जाहीर निषेध केला. अनिल बोंडे च्या प्रतिमेला युवासैनिकांतर्फे चप्पल मारून निषेध करण्यात आलेला आहे. यावेळी या भाजप खासदाराचं करायचं काय? खाली डोके वरती पाय, निषेध असो-निषेध असो, अनिल बोंडेचा निषेध असो, शिवव्याख्यात्याचा अपमान करणाऱ्या खासदाराचा निषेध असो याप्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास शिव व्याख्याते शिवव्याख्यानाच्या माध्यमाने देशभर प्रवास करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवीत असतात. याप्रकारे एका लोकप्रतिनिधीकडून शिवव्याख्यात्याचा अपमान युवासेना कदापी सहन करणार नाही अशी भावना युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांनी व्यक्त केली.
यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, विधानसभा युवा अधिकारी अमित जगताप, युवासेना कॉलेजकक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रितम शिंदे, महानगर युवा अधिकारी सोमसिंग राजपूत, युवासेना कॉलेजकक्ष अधिकारी प्रविण भगत, तुषार न्हाळदे, भुषण अहिरे, भावेश साळवे, ओम चौधरी, अक्षय काबरा, मोहीत राठी, संस्कार मोहीते, चैतन्य भंगाळे, सयाजी जाधव, विवेक जावळे, अल्फैज पटेल, मयुर अल्करी, अजय खैरनार, हर्षल मुंढे, संदिप सुर्यवंशी, उमाकांत जाधव, तेजस श्रीश्रीमाळ, यश राठोड आदि युवासैनिक उपस्थित होते




















