बीड : वृत्तसंस्था
हळदीच्या समारंभात बंदुक घेऊन स्टाईल मारणे एका नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. चक्क आपल्या नववधू समोर हळदीच्या कार्यक्रमात नाचताना उत्साहाच्या भरात नवरदेवा ने हवेत गोळीबार केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच मांडवात एन्ट्री घेतली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. अंबाजोगाई पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. ज्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला त्या बंदुकीचा पोलिस शोध घेत आहेत.
काही मित्रांनी नवरदेवाला खांद्यावर घेतले आणि डान्स करायला सुरुवात केली. नवरदेवाने हातात बंदुक घेऊन थेट दोन वेळा हवेत गोळीबार केला. तर त्याआधी नवरदेवाच्या एका मित्राने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाला नाही. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. नवरदेवाकडील आडनाव हे चाटे असल्याचे समजते मात्र अद्याप त्याचे नाव कळले नाही.