जामनेर :प्रतिनिधी
नवी मुंबई येथे कंठवली येथील संत सेवालाल महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत स्नेहल किसन राठोड यांच्या स्व मालकीच्या जागेत गोर बंजारा समाजाचे धर्मपिठ समाजातील दानशूर व्यक्तींनी दान व देणगीच्या माध्यमातून बांधकाम सुरू करण्यात आले.
परीसरात सभा मंडप, पिण्याच्या पाण्याची टाकी, स्वच्छता ग्रुह, भक्त निवास यांचे बांधकाम सदर ग्रामपंचायतीची पुर्व परवानगी घेऊनच केले आहे. परंतु नवी मुंबई येथील सिडकोच्या अधिकारी यांनी होत असलेले काम हे अनधिकृत ठरवून अचानक पणे हल्ला करीत स्वच्छता ग्रुह, पाण्याची टाकी,भक्त निवास सभागृह ई. बांधकाम सुरू असताना पाडून जमीन दोस्त करण्यात आले. या घटनेने गोर बंजारा समाजात संतापाची लाट पसरली आहे.
जाणीवपूर्वक बंजारा समाजाचे खच्चीकरण करणासह लक्ष केले जात असल्याची भावना होत आहे. या बाबतीत जामनेर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार श्री. अरुण शेवाळे यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी तालुकाध्यक्ष पप्पु तंवर, तालुका उपाध्यक्ष शत्रूघ्न चव्हाण, सदस्य नानक तंवर, जिवन राठोड, निलेश चव्हाण यांचेसह गोर बंजारा समाजाचे प्रमुख पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.