पुणे : प्रतिनिधी
मनसे नेते वसंत मोरे हे अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत येत असतात. ते कधीही कोणत्याही अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करताना दिसून येत असतात. काहीवेळा त्यांच्यासोबत वेगवेगळे प्रसंग घडत असतात तेही ते आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करताना दिसून येत असतात.
आता असाच एक प्रसंग वसंत मोरे यांनी ट्विट करुन शेअर केला आहे. मंगळवारी त्यांना एक महिला लहान बाळासोबत दिसली होती. ती एकटीच होती. त्यावेळी ती ज्या बसमधून उतरली होती ते ड्रायव्हर आणि कंडक्टर तिथे होते. त्या महिलेला तिचा दीर घ्यायला येणार होता, पण ती वाट पाहून थकली होती.
त्यानंतर वसंत मोरे यांनी त्या महिलेची चौकशी केली असता ती पंधरा मिनिटांपासून दीर येण्याची वाट पाहत होती. तसेच तिथे असलेले बस ड्रायव्हर नागनाथ नवरे आणि कंडक्टर अरुण दसवडकर हेही तिथेच थांबले होते, कारण त्या महिलेला तिथे एकटे सोडणे ठिक नव्हते. त्यावेळी वसंत मोरेंनी तिची चौकशी केली आणि नंतर त्यांनी स्वत: त्या महिलेला घरी पोहोचवले.
वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज – कोंढवा राजस चौक, पुणे. मी काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक @PMPMLPune ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता.
१/५ pic.twitter.com/mqiCUshNPx— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 15, 2022
वसंत मोरे यांचे ट्विट-
वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज – कोंढवा राजस चौक, पुणे. मी काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक पीएमपीएमएलची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता.
थोडा संशय आला म्हणून कंडक्टरला विचारले काय प्रकार आहे तेव्हा ते म्हणाले की आम्ही सासवडवरून आलोय, गाडीत एक महिला आहे तिला छोटे बाळ आहे. त्या इकडे बाजूला राहतात. निघताना सांगितले होते की त्यांना राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल पण १५ मिनिटं झाले कोणीच येत नाही, फोन लागत नाही.
आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण, आणि आता रिक्षाही मिळत नाही. मग मी म्हटलं त्यांचा दीर नाही आला म्हणून काय झालं मीच त्यांचा दीर झालो त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोहचवले. घराच्या दारात पोचवले म्हणून फोटोही काढला.
पण खरे धन्यवाद त्या एमएत १२ आरएन ६०५९ बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचे! त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिले. त्या दोघांची नावे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर! यात एक चूक घरच्यांची, एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली? बर सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजीपणा का केला ? थोडे तरी शहाणे व्हा.




















