फैजपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावर अज्ञान वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी घडली.
सविस्तर वृत्त असे की, गोपाळ कडू सोनवणे (वय ५५) रा. मुंजलवाडी ता. रावेर हे त्यांची पत्नी अनिता गोपाळ सोनवणे यांच्यासह दुचाकीने भुसावळ येथून मुंजलवाडी येथे बुधवारी २० एप्रिल रोजी सकाळी जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावरून जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत गोपाळ सोनवणे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी अनिता सोनवणे ह्या गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.