पहुर ः प्रतिनिधी
जळगाव – औरंगाबाद महामार्गावर पहूर येथे दुचाकीने घरी जाणारे पती-पत्नींना अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी असल्याचे समजते.
मिळालेली माहिती अशी की, पहूर येथील जामनेर रोडवर काल रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीचालक ज्ञानेश्वर सोनवणे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सरला सोनवणे या गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा हलविण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पहूर पोलिस स्थानकात अपघातात नोंद करण्याचे काम सुरु होते.