• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव
0
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
Share on FacebookShare on Twitter

नैसर्गिक शेतीकडे वळा – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

जळगाव मिरर | २० मार्च २०२६

“शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान आहे. रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

देशातील शेतीजमीन सुपीक राहावी, रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि शाश्वत शेतीला चालना मिळावी या उद्देशाने अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ,आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह विविध मान्यवर, सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुढे सांगितले की, रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहे. योग्य पद्धतीने नैसर्गिक शेती केल्यास उत्पादनात घट होत नाही, उलट जमिनीची गुणवत्ता सुधारते. “धरती माता वाचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी किमान काही क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग करावेत, असे आवाहन केले.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आपण जमिनीला केवळ उत्पादन देणारे साधन समजतो; मात्र तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. वाढत्या रासायनिक खत व कीटकनाशकांच्या वापरामुळे अन्नातून शरीरात जाणाऱ्या रसायनांमुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मातीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भारत हा जगात एकमेव देश आहे जो भूमीला ‘माता’ मानतो. मात्र, आपणच तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता आणि अन्नाची गुणवत्ता धोक्यात येत असून त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील शेतीजमीन रासायनिक खतांच्या वापरामुळे निकस होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी व पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांनी सन २०२१ पासून ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ हे राष्ट्रव्यापी जनअभियान सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरातील सुमारे ३० हजार गावे व ५४ हजार शहरी भागांत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ अमळनेर येथे करण्यात आला.

या अभियानाचा कालावधी १९ मार्च २०२६ ते अक्षयतृतीया १९ एप्रिल २०२६ पर्यंत राहणार असून या कालावधीत देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी भूमी सुपोषण व संवर्धन अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘धरती माता संरक्षण’ करण्याचा संकल्प घेत अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group