जामनेर : प्रतिनिधी
वेदिकस इंटरनॅशनल अकॅडमी यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रतियोगातेच्या अबॅकस परीक्षेत सहाव्या लेव्हल मध्ये येथील सरस्वती क्लासचा विद्यार्थी शुभम नटवर चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वैदिक गणितामध्ये दुसऱ्या लेव्हलला द्वितीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज यांनी शुभमसह सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून आशिर्वाद दिला. त्यावेळी शुभमचे वडील नटवर चव्हाण, राजेश नाईक, दिनेश चव्हाण, प्रवीण जाधव उपस्थित होते.