मुंबई: मुंबईत आणि महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून जल्लोष बघतोय. घाण निघून गेली आता चांगलंच होणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. कल्याण डोंबिवलीचे, ठाण्याच्या लोकांना आमच्यापर्यंत,पोहोचू दिलं जात नसल्याचं सांगितलं. आमचंही त्यावेळी चुकलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाइव्ह द्वारे घरात पोहोचले. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला नव्हेच तर देशाला दिशा दिली. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत ग्लासगोला गेलो. मुख्यमंत्र्यांची सर्जरी झाली होती, मला त्यांनी महाराष्ट्रासाठी पाठवलं. तिथं देखील महाराष्ट्रानं जशा प्रकारे करोना हाताळला त्याचं कौतुक केलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील जे लोक राजकारण कळतं पण राजकीय नाहीत त्यांनी मेसेज पाठवले, असं आदित्य ठाकरे म्हणाले. विश्वासदर्शक ठराव होणार आहेत. मुंबईत ज्यावेळी येतील त्यावेळी विमानतळावरुन विधानभवनात जाण्याचे रस्ते वरळीतून आहे, वरळीतून नाही तर परळ मधून रस्ते आहेत. भायखळ्यातून रस्ता आहे. ही मुंबई हा महाराष्ट्र आपल्याला दुसऱ्याच्या हातात जाऊ द्यायचं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. केंद्र सरकार फ्लोअर टेस्टला आर्मी लावेल, पॅरामिलिटरी फोर्स लावेल, केंद्र सरकारला जगाला, देशाला आणि राज्याला उत्तर द्यावं लागेल,असं आदित्य ठाकरे म्हणाले.




















