जळगाव : प्रतिनिधी
शहरात दि २ जूनपासून आम आदमी पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. या वेळी पार्टीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा उपक्रम सुरु झाला.
जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात दत्तनगर मेहरून शिवारा मधून करण्यात आली सदस्यता नोंदणी ला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज तब्बल 160 नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली जळगाव शहर आम आदमी पार्टीचे कार्य अध्यक्ष योगेश हिवरकर तसेच आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हा अल्पसंख्यांकिक जिल्हा अध्यक्ष. इर्शाद खान.व रईस कुरेशी यांच्या उपस्थितीत सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख कार्यकर्ते. प्रवीण चौधरी. जाकीर भाई पठाण. युनूस शेख, हेमराज सोनवणे, पवन खंबायत, दुर्गेश निंबाळकर.आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले